
वाळूजमहानगर, (ता.15) – वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जंतुनाशक गोळ्याचे वाटप व मार्गदर्शन करून मंगळवारी (ता.13) रोजी जंतनाशक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सचिन वाघ, विद्या सोनोने, रिता मार्कंडेय, सुवर्णा शिंदे, योगिता देवकाते, दीपाली काळबांडे, लईक शेख यांनी शालेय पोषण आहारानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक अल्बेंडाझोल गोळी वाटप करून चावून खायला सांगितले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सुनील चिपाटे म्हणाले की, सर्व 6 ते 19 वयोगटातील मुलामुलींना शाळा, महाविद्यालय आणि समुदाय स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे शासन निर्देश आहेत. आरोग्य विभागाने त्यासाठी पूर्वतयारी केली आहे. मुलामुलींची एकाग्रता, कार्यक्षमता वाढविणे, रक्तक्षय, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब रोखणे आणि शारीरिक व मानसिक वाढीस जंतनाशक गोळी मदत करते. ही गोळी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. असे आदेश वजा आवाहनही त्यांनी केले.
