वाळूजमहानगर – वडगाव (को.) – बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदी आमदार संजय सिरसाठ यांच्या हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलचे सुनिल काळे यांची तर उपसरंपचपदी ज्योती श्रीकांत साळे यांची शुक्रवारी (ता.7) रोजी बिनविरोध निवड झाली.
या ग्रामपंचायत निवडणुकीत सतरापैकी अकरा जागांवर आमदार संजय सिरसाठ यांच्या हिंदुह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्या खालोखाल शिवसेना एकनिष्ठ पॅनलला चार तर भाजपाला दोन जागा मिळाल्या. ओबीसीसाठी आरक्षित असलेल्या सरपंच आणि उपसरंपच पदासाठी शुक्रवारी (ता.7) रोजी निवडणूक झाली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल कुलकर्णी, ग्रामसेवक हरीश आंधळे व प्रशासक दीपक बागुल यांनी काम पाहिले. या निवडणुकीत सिरसाठ यांच्या गटाचे सुनिल काळे यांनी सरपंच तर उपसरंपच पदासाठी ज्योती श्रीकांत साळे यांनी अर्ज दाखल केले. अखेरपर्यंत या पदासाठी कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने सरपंचपदी सुनिल काळे तर उपसरंपचपदी ज्योती साळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. या निवडणुकीत सुनील काळे, सुनीता राजेश साळे, छायाबाई सोमीनाथ प्रधान, विष्णू उगले, माधुरी राजन सोमासे, राणी रामकिसन पाटोळे, माया सतीश पाटील, संभाजी चौधरी, पूनम प्रकाश भोसले, सुरेखा अशोक लगड, मंदा कैलास भोकरे, रामदास गवळी, ज्योती श्रीकांत साळे,उषा पोपट हांडे यांनी सहभाग घेतला. तर शिवसेनेचे कमलबाई कल्याण गरड, विजय सरकटे व सागर शिंदे हे गैरहजर राहिले. दरम्यान सरपंचपदी सुनिल काळे यांची तर उपसरंपचपदी ज्योती साळे बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी आमदार संजय सिरसाठ, विजया सिरसाठ, हर्षदा सिरसाठ, माजी नगरसेवक सिध्दांत सिरसाठ, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, पश्चिम तालुकाप्रमुख राजेश कसुरे, माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे, श्रीकृष्ण भोळे, माजी सरपंच एकनाथ साळे, शशीकांत ढमढेरे, उद्योजक दशरथ मुळे, माजी पं.स. सदस्य राजेश साळे, अप्पासाहेब साळे, संतोष नरवडे, कुशल पाटणी, ज्ञानेश्वर गायकवाड, शरद पवार, सचिन प्रधान, रमाकांत भांगे, संदीप आढाव, राजन सोमासे आदींची उपस्थिती होती. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्यामकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक चेतन ओगले, उपनिरीक्षक संदीप शेळके, राहुल निर्वळ, पो. अंमलदार अविनाश ढगे, योगेश शेळके, राजेंद्र उदे, लखण घुसिंगे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
