वाळूजमहानगर (ता.16) :- वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता.14) रोजी बालदिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुलांचे लाडके चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मुलांना मिष्टान्न म्हणून केशरभात देण्यात आला. यावेळी सचिन वाघ, अनिता राठोड, विद्या सोनोने, मंगला गाडेकर, सोनाली निकम यांची उपस्थिती होती.