वाळूज महानगर – वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद शाळेत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मुलांना थोरांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचे वाटप तसेच सामूहिक वाचन या विविध उपक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.15) ऑक्टोंबर रोजी करण्यात आले.
या बरोबरच शाळेत आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खाद्य पदार्थांच्या विविध स्टॉलवर विद्यार्थी, शिक्षक पालकांनी मोठी गर्दी करून पदार्थांचा आस्वाद घेतला. शेवटी सर्वांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हात धुण्याच्या सात स्टेप्स गीताचे कृतियुक्त गायन केले. मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सचिन वाघ, हरिश्चंद्र रामटेके, विद्या सोनोने, अनिता राठोड, सोनाली निकम, मंगला गाडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.