वाळूजमहानगर, ता.25 – आमच्या घराकडे काय पाहतोस असा जाब विचारत दोघांनी एकास रस्त्यात पकडून मारहाण सुरू केली. त्याचवेळी त्याचे नातेवाईक मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांना सुद्धा शिवीगाळ करून मारहाण झाली. ही घटना बुधवारी (ता.22) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश हौसिंग सोसायटी, वडगाव (को.) येथील हिमाशु संतोष सिंह व त्याचा भाऊ मनिष हे दोघे बुधवारी (ता.22) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास भाजीपाला आण्यासाठी जात होते. रस्त्यात त्यांना त्याचे नातेवाईक अजय दिग्विजय सिंह यास सुनिल चुनार व त्याचा भाऊ हे दोघे ‘तु आमच्या घराकडे का ? पाहतोस’ असे म्हणून मारहाण करीत होते. हे पाहून हिमाशु व त्याचा भाऊ हे दोघे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता, चुनार व त्याच्या भावाने अजय सिंह यांच्याबरोबरच मनीष व हिमांशू या दोघांनाही मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सुनिल चुनार व त्याचा भाऊ या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.