March 22, 2026

वाळूज महानगर – वडगाव कोल्हाटी येथेच चुलत भावाकडे राहणारी 17 वर्ष 9 महिन्याची मुलगी दुकानावर मेमोज खाण्यासाठी गेली असता तीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. ही घटना बुधवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथे चुलत भावाकडे राहून बारावीचे शिक्षण घेणारी सतरा वर्ष नऊ महिन्याची मुलगी बुधवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुकानावर मेमोज खाण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरीही ती घरी परत न आल्याने तिचा पाच वाजेपासून परिसरात व नातेवाईकांकडे मित्रमंडळ शोध घेतला मात्र ती निवडून आली नाही. त्यामुळे तीला कोणतरी अज्ञात आरोपीने काहीतरी फुस लावून पळून नेल्याचा संशय आल्याने तीच्या भावाने वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *