
वाळूज महानगर, (ता.24) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 21 येथे स्री जातीचे जातीचे नुकतेच जन्म झालेली अर्भक फेकलेल्या अवस्थतेत आढळले. ही घटना शनिवारी (ता.24) रोजी सायंकाळी 5.15 वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार गट वडगाव नंबर 21 मध्ये मोकळ्या कामगार काम करीत असतांना अर्जुन संतोष हावणोर वय 18 या कामगाराला नुकताच जन्म झालेल्या एक अर्भक दिसले, संतोष ने ही माहिती सुमित चोरडिया यांना दिली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, कर्मचारी कल्याण खामकर, नितीन इनामे, वैभव गायकवाड, समाधान पाटील, युसूफ शेख यांनी घायस्थळी धाव घेत स्री जातीच्या या मृत अर्भकाला घाटी दवाखान्यात दाखल केले. या घटनेची माहिती वडगाव कोल्हाटी गावात मिळताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. नेमकं हे अर्भक कुणी फेकले याचा शोध पोलिस घेत आहे.
