वाळूजमहानगर (ता.23) – वाळूज परिसरातील वडगाव (कोल्हाटी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. पालकांमधून निवडण्यात आलेल्या सदस्यांत शंभर टक्के महिला सदस्य निवडून आल्याने समितीवर महिला राज प्रस्थापित झाले आहे.
निवड झालेल्या सदस्यांतुन जयश्री निकम यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडून आलेल्या इतर पालक सदस्यांत कमल पठ्ठे, कविता मानकर, प्रजावती मुनेश्वर, रंजना बोर्डे, रेखा रमणे, आशा डीवरे यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनी शिक्षण तज्ज्ञ म्हणून कृष्णा साळे यांची तर पदसिध्द सचिव म्हणून सुनील चिपाटे, शिक्षक प्रतिनिधी सचिन वाघ यांची निवड केली. निवड प्रक्रियेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.