
वाळूजमहानगर, (ता.8) – वडगाव कोल्हाटी गट नंबरमध्ये शाळकरी मुलींच्या छेडछाडीसह लुटमार व जाळपोळीच्या घटना वाढत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आवरण्यासाठी परिसरात पोलीस चौकी देण्यात यावी. असे साकडे घालून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निरीक्षक संदीप गुरमे यांना निवेदन सादर केले
वडगाव (कोल्हाटी) गंट नं मध्ये रोडरोमीयोकडुन शाळकरी मुलींच्या छेडछाडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शाळकरी मुलीना शाळेत जाने सुद्धा कठीण झाले आहे. तसेच चोऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वटमारीच्या प्रकारातही वाढ झाली असून या पुर्वी सुद्धा बऱ्याच कामगाराना रस्त्यात आडुन मारने, पैसे लुटले गाड्या जाळणे तसेच या वसाहती मध्ये घर फोड्याचे सत्र सुरूच आहे. या पुर्वी पोलीसांना निवेदन देऊन सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई न कल्याने दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिला आघाडीच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन दिले. या निवेदनाची पोलिसांनी तात्काळ दाखल घेऊन कारवाई करावी, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस पोलीस चौकी करण्यात यावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आदोंलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर विभाग संघटिका छायाताई जाधव शिवसेना विभाग प्रमुख बिबन सय्यद शिवसेना गटप्रमुख त्रिंबक जगताप, जोत्सना सोनवणे, भारती महाजन, लता देवरे, उमेश गिरी, युवराज जाधव यांच्यासह आदींची नावे असून त्यांची उपस्थिती होती.
