वाळुज महानगर (ता.31) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वज्रमुठ महाविकास आघाडीची विराट जाहीर येत्या दोन एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन शुक्रवारी (ता.31) रोजी निमंत्रण दिले.
———–—
वाळुज महानगरात 1 बीएचके फ्लॅट किरायाने पाहिजे. तात्काळ संपर्क करा – 99 23 27 63 66
———–
महाविकास आघाडीची दोन एप्रिल ची वज्रमुठ ही जाहीर सभा अति विराट करण्याचा मनसुबा आखला आहे. त्यामुळे या सभेसाठी शिवसैनिकांनी शुक्रवारी (ता.31) रोजी वाळूज महानगर परिसरातील शरणापुर, म्हाडा काँलणी, राजस्वप्नपुर्ती येथे घरोघरी जाऊन सभेचे नागरिकांना निमंत्रण दिले. 
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपतालुकाप्रमुख तथा तिसगावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णु पाटील जाधव, विभागप्रमुख अतुल दाभाडे, उपविभाग प्रमुख अंकुश कान्हेरे, शाखाप्रमुख संतोष खजिनदार, संदीप राजधानी, गुलाब हिवरडे, उपशाखाप्रमुख गणेश काळे, दिनेश कान्हेरे, भगवान आदाने, उत्तम कापसे, रवी चव्हाण, दिपक कान्हेरे, रामेश्वर कान्हेरे, शाखाप्रमुख गणेश कोल्हे, महलिंग आप्पा, सदावर्ते पाटील, भानुदांस सांगळे, गजानन मनोरे, संजय जगताप, सोमनाथ कान्हेरे, अक्षय केरे, सुनिल कान्हेरे, साईनाथ वाढेकर, रामेश्वर अधाने, नंदू भवर, बाबासाहेब सोनटक्के, राजू बनकर, विलास कांबळे, कडूबाल जाधव, कचुरू पडूळ, त्रिमूर्ती करपे, संदीप मस्के, राहुल पाटील, दत्तू चव्हाण, काकासाहेब लांडगे, संताेष मनगटे, अंकुश ईंगळे, गणेश सदावर्ते, सुनिल वाटाेरे, जयाजी मुरकुटे, विनाेद धाडवे, विनाेद हिरे, पांडुरंग पदमने, विजय गुट्टे, मनाेज बावस्कर व नागरिक उपस्थित होते.
