
वाळूजमहानगर, (ता.22) – पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालयात शनिवारी (ता.16) रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुणे येथील नवलमल फिरोदिया विधि महाविद्यालयाच्या प्रज्वल नरवडेने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय दादा पाटील राजळे महाविद्यालयाची सिद्धी बाफना, तर तृतीय संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचा कार्तिक भराड तसेच उत्तेजनार्थ नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या महेश उशीर यांनी पटकावला.

श्री आनंद महाविद्यालयात या राज्यस्तरीय स्पर्धा शनिवारी (ता.16) रोजी घेण्यात.
स्पर्धेसाठी कै. सुजाता गुगळे यांच्या स्मरणार्थ विश्वजित गुगळे यांनी आनंद करंडक ट्रॉफी व रोख बक्षीस ठेवले होते. स्पर्धेसाठी संभाजीनगर, पुणे, बीड, नाशिक व अहमदनगर आदी जिल्ह्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्थ धरमचंद गुगळे, राजकुमार मुथा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य विश्वजित गुगळे होते. यावेळी प्राचार्य जी.पी. ढाकणे, प्राचार्य डॉ. शेषराव पवार आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.रामनाथ कातकडे, सोपान नवथर यांनी काम पाहिले.
