February 22, 2025
  • वाळूजमहानगर – औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल निहाय सत्ता संपादन मेळाव्याचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यशस्वी रित्या चालू असुन या मेळाव्यामुळे येथील वंचित समाजाला सत्ते पर्यंत नेण्यास मोठी मदत होईल. असे मार्गदर्शनपर प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा औरंगाबाद तालुक्यांचे निरिक्षक रुपचंद गाडेकर यांनी केले.                                  वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुका अंतर्गत वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर या दोन जिल्हा परिषद सर्कलचा संयुक्त सत्ता संपादन मेळावा रविवारी (ता.11) सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता बजाजनगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी औरंगाबाद पुर्वचे जिल्हा महासचिव महेश निनाळे, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर तायडे, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भावि गवई यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पच्श्रिम तालुका अध्यक्ष अंजन साळवे होते.

या कार्यक्रमाला जिल्हा सदस्य पंडीत तुपे, स्टार प्रचारक शाहिर मेघानद जाधव, सम्यक विद्यार्थी आंदोलनांचे शहराध्यक्ष संकेत कांबळे उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद पच्श्रिम तालुका महासचिव एस पी हिवराळे, सुगंध दाभाडे, प्रेम बनकर, सतीश महापुरे, नितीन शेजवळ, अमृता डोगरदिवे, सईद बाबा पठाण, नंदकुमार गाडेकर, संदीप जाधव, तौफिक शेख, सागर तुपे, सिद्धार्थ बनकर, अनिल थोरात, सोमनाथ सांगळे, हाशम पटेल, अमोल चव्हाण, अरविंद पवार, अनिल जाधव, दीपक रगडे, आनंद खरात, नितीन घोरपडे, अशोक त्रिभुवन, ज्ञानशील वाघमारे, अनिल कांबळे, हणमंत नामाकर, शैलेश गजभिये, सागर त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अंजन साळवे, सूत्रसंचालन साहेबराव इंगोले तर आभार एस पी हिवराळे यांनी मानले. कार्यक्रमास गंगापूर तालुकाध्यक्ष युनूस पटेल, युवा अध्यक्ष गंगापूर नितीन शेजुळ, शेख तोफीक, गणेश खोतकर, हरदास बोर्ड, बाबासाहेब दूसिंग, भय्यासाहेब जाधव, अशोक कानडे, विकास रामटेके, एल एल गायकवाड, रामदास बर्फ, संदीप जाधव, हानिफ पटेल, राहुल बंनसोडे, संदीप रोकडे, अण्णा जाधव, गणेश गाडेकर, शशिकांत गोफने, बालाजी भालेराव, शेख इस्माईल, अशोक वाहूल, शुभम साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *