
वाळूज महानगर, (ता.19)- बजाजनगरातील लोकमान्य चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्ताने उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, सरपंच सुनील काळे, उपतालुकाप्रमुख कैलास भोकरे, अरविंद धीवर यांच्या हस्ते सामुदायिक महाआरती घेऊन मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सुदाम भांडे, शिवाजी ढेपे, शशिकांत मढेरे, पोपट हांडे, काकाजी जिवरग, बीबन सय्यद, विनोद कदम, अमोल पोटे, सतीश हिवाळे, नामदेव सगडे, संतोष चंदन, भगवान ढेरंगे, विनोद दाभाडे, आदिक पाटील, रावसाहेब शिंदे, विनोद कदम, लक्षिमण जगताप, सागर जाधव, दिलीप सणास, माऊली राऊत, पवार रामेशोर, रवी धापटे, अर्जुन उबाळे, छाया जाधव, छाया कूकलारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.
