
वाळूजमहानगर, ता.29) – वाळूज महानगर परिसरातील ‘ गरवारे कम्युनिटी सेंटरच्या एकोणिसाव्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत बजाजनगर येथील शिवछत्रपती विद्यालयातील विद्यार्थिनिंनी ‘ बिहू ‘ या आसामी लोकनृत्याचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करुण स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविले.

या स्पर्धेत लोकनृत्य सादर केलेल्या सर्व सहभागी विद्यार्थीनी दिव्या कोकाटे, स्नेहल शिंदे, सुजाता साह, प्राची मोरे, संचिता नागे, श्रद्धा बोचरे, शुभांगी बासरे व योगिता गाडेकर यांचे शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने शाळेच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले व उपाध्यक्ष मधुकर जाधव यांनी कौतुक करून स्वागत केले. करण्यात आले. 
या स्पर्धेकरिता शाळेतील सहशिक्षक गणेश लोंढे, नागेश कदम, अमोल चव्हाण, सारिका डोंगरे, विजया कोळी आणि प्रतिभा काळे त्यांचे सहकार्य लाभले.
