February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.16) – तीस दिवसात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, अंदाजे साठ दिवसात स्ट्रीट लाईटचे काम व शक्य तितक्या लवकर ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येईल. अशा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सुनील काळे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर वडगाव कोल्हाटी गट नंबर 9 मध्ये गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या उपस्थितीत सोमवारी 15 डिसेंबर रोजी सोडले.

पिण्याचे पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज लाईन अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याने वडगाव कोल्हाटी येथील गट नंबर 9 मधील महिलांनी गुरुवार 11 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षासह वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गट नंबर मधील नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे ग्रामपंचायत व सत्ताधाऱ्यांनी विरोधात चांगलेच वातावरण तापले होते. तसेच उपोषणाच्या चौथ्या दिवसापासून उपोषणार्थी महिलांची प्रकृती खालावली होती. परिणामी सत्ताधाऱ्याविरोधात रोष व्यक्त होत होता. त्यामुळे अखेर वडगाव कोल्हाटी- बजाजनगर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील काळे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सोमवारी 15 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्यासह उपोषणार्थी ज्योती कांबळे, रत्ना पवार, आश्विनी बासवडे, सिमा पायघोन, प्रमिला म्हस्के, अश्विनी भालेकर, वैशाली राजपुत, सारीका काळे, शितल साठे, कविता आधाने, ललिता आधाने, चित्रकला दांडगे, प्रिती चव्हाण, स्वाती डुमने, हेमलता रंगारी, करिष्मा शेख, सुलताना सय्यद, कोमल देशमुख, रुपाली ओहोळ, वैशाली धसकट, रूपाली गायकवाड, सुचिता गायकवाड, आरती पळसकर, सारीका गिरासे, उषा गिरासे, राधिका भारती, ज्योती पोपळघट, प्रिती सवई, आरती उगले, कोमल देशमुख, चंदा बनकर, शीतल पवार, जयश्री बेंद्रे, छाया वाघ, मंगल पाटेकर, कावेरी फुले, वनीता चव्हाण, अंजली वाघमारे, सुलभा तिकांडे, संगीता महीफळ, गंगुबाई तांगडे, वंदना मुळे, मीना दौढ, अर्चना नरोडे, यशोदा हिवाळे, नागिना गायकवाड, वंदना सूर्यवंशी, रेवती वाघमारे, नंदिनी तेलंगे, सुनिता सोळसे यांच्यासह गट नंबर 9 मधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काय आश्वासन दिले ग्रामपंचायतने –
याबाबत उपोषणार्थी ज्योती मारोती कांबळे व इतर यांच्या नावाने ग्रामपंचायत वडगांव (को.)- बजाजनगरचे सरपंच सुनील काळे यांनी सोमवारी 15 डिसेंबर रोजी रात्री दिलेल्या लेखी आश्वासनात असे म्हटले आहे की, मौजे वडगाव (को.) मधिल गट नं.9 मध्ये मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने उपोषणास बसण्याची परवानगी मिळण्यासाठी 8 डिसेंबर रोजी रोजी दिलेले पत्र 10 डिसेंबर रोजी प्राप्त झाले. आपल्या मागणीनुसार जलजीवनमिशन अंतर्गत काम जागेअभावी प्रलंबित होते. परंतु जागेचा प्रश्न संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे काम साधारणत: 30 दिवसांच्या आत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरू होईल. स्ट्रीट लाईटचे काम निधी उपलब्ध झाल्याबरोबर अंदाजे 60 दिवसापर्यंत केले जाईल. तसेच ड्रेनेज लाईनचे जे काम बाकी आहे ते काम जेवढे मुख्यलाईनला जोडणे शक्य होईल ते काम करून देण्यात येईल. तरी आपण करत असलेले उपोषण थांबवावे. अशी विनंती करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *