
वाळूजमहानगर (ता. 8) :- महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि अकोला टेनिस क्रिक्रेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या सिनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत लिटिल एंजल्स स्कुल बजाजनगर औरंगाबाद येथील मुलींच्या संघाने तृतीय विजेतेपद पटकावले.
अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री स्टेडियममध्ये ही स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत एकूण २३ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी चंद्रकांत उप्पलवार, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या संघातील नंदिनी देशमुख हिने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. तसेच पिनल देवकर, अक्षदा नवले, प्रगती पवार यांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्राची सावंत, निकिता म्हस्के, पूनम लोखंडे, विश्वा जोशी, सिमरन सिद्दीकी, दामिनी जाधव, समीक्षा नलावडे, प्रतीक्षा बोरुडे या सर्व खेळाडू तसेच संघाचे मार्गदर्शक शफी शेख आणि दीपमाला राजपूत यांचे शाळेच्या संचालिका मोनाली महालपुरे आणि मुख्याध्यापिका स्वाती पाटकरी यांनी स्वागत केले.
