
वाळुज महानगर, (ता. 6) – आषाढी एकादशी निमित्त छोटे पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लिंबे जळगाव येथे बंद पाणी बॉटल वाटप करण्यात आले. 
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, नंदकुमार गाडेकर, सईद बाबा पठाण, ज्ञानेश्वर जाधव, काकासाहेब त्रिभुवन, मधूकर त्रिभुवन, कुष्णा गाडेकर, आदित्य गाडेकर, करण गाडेकर, आयुष गाडेकर आदींसह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
