
लिंबेजळगाव, (ता.21) – लिंबेजळगाव (ता .गंगापूर) येथे परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांचा दणदणीत विजयी झाल्याबद्दल त्यांचा माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्रकार जमील पठाण यांच्या हस्ते बुधवारी (ता.21) रोजी सकाळी नागरी सत्कार करण्यात आला.
हाजी युनूस पटेल, रुपचंद गाडेकर, रामेश्वर दाणे यांनी स्वतः चा पॅनल उभा करून वार्ड क्रमांक 4 मध्ये 3 जागेसाठी 3 उमेदवार उभे करून जोरदार लढत दिली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत हाजी शेख युनूस पटेल 83 मतांनी विजयी झाले. तर सर्वसाधारण महिला मधून सविता रुपचंद गाडेकर आणि ओबीसी जागेवर आसराबाई उद्धव दाणे या तिन्ही उमेदवार दणदणीत विजयी झाले. त्या बद्दल त्यांचा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्रकार जमील पठाण यांनी नागरी सत्कार केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर दाणे, विविध सेवा संस्थेचे अध्यक्ष कारभारी गोलांडे आदींची उपस्थिती होती.
