March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.14) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागे असलेली दुचाकी दुभाजकाला धडकली. बुधवारी (दि.14) रोजी सकाळी लिंबेजळगावजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंबेजळगाव येथील ईस्राईल शेख (वय 26) व त्यांची पत्नी शिफा ईस्राईल शेख (वय 19) हे बुधवारी (दि.14) रोजी सकाळी लिंबे जळगाव येथून स्कुटी (एम एच 20, सी एम -6977) या दुचाकीवरून गंगापूरकडे जात होते. छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर लिंबेगाव जवळील जुन्या ॲम्बुलन्स पॉईंटजवळ एका अज्ञात चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने ईस्राईल शेख यांची दुचाकी
दुभाजकाला जाऊन धडकली.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात स्कुटीवरील इस्राईल शेख व शिफा इस्राईल हे पती-पत्नी जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप यांनी तात्काळ अपघात स्थळे धाव घेत जखमींना टोल नाक्यावरील सीएसएमएसएस या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी हॉस्पिटलमधून आलेल्या माहितीवरून वाळुज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *