March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.20) – लिंबे जळगाव येथील टोल नाक्याजवळ असलेल्या एका कंपनीतील 23 वर्षीय कामगार अचानक बेपत्ता झाला. हा प्रकार गुरुवारी 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, टोल नाक्याजवळील लुमिनस सेप्टीगल्स या कंपनीचा कामगार सोनु नथुनी पंडीत कुमार (वय 23 वर्ष), रा. लिंबेजळगाव, ता.गंगापूर हा गुरुवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी आला. त्यानंतर 11 वाजेच्या सुमारास सॅमसंग एफ 15 कंपनीचा मोबाईल सोबत घेऊन सोनू कुमार हा काहीही न सांगता घरातून निघुन गेला. तो अद्यापही घरी परत आला नाही. म्हणुन त्याचा आजुबाजूच्या परीसरात शोध घेतला. शिवाय नातेवाईक व त्याच्या मित्रांना विचारपुस केली असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी प्रियंका सोनु कुमार (वय 20 वर्षे) या महिलेच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.
त्यांचे वर्णन असे –
संपुर्ण नाव सोनु नथुनी पंडीत कुमार, वय 23 वर्ष, रंग सावळा, केस छोटे, उंची अंदाजे 5.3 फुट, शरीर बांधा सडपातळ, अंगात राखाडी रंगाचा शर्ट, काळया रंगाची जिन्स, पायात चप्पल, भाषा हिंदी बोलतो. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास वाळूज पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ खोसरे यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *