लिंबेजळगाव : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, व भजनाचा नाद गजर करीत गुरुवारी 6 आक्टोंबर अश्विन शुद्ध ‘पांशांकुशा एकादशी निमित्त लिंबे जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) पायीवारी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात मार्गस्थ होऊन दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) येथे महाआरती करण्यात आली.
हभप उद्धव महाराज आनंदें, हभप श्री रामायणाचार्य संजय महाराज कुर्हाडे गुरुजी, हभप पांडुरंग महाराज काका यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली प्रारंभ झालेल्या या सोहळयात आनंदाचा महापुर वाहत आहे. दर महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला निघत असलेल्या या पायीवारीत असंख्य वारकरी भाविकांनी सहभाग घेऊन जीवनाचे मुल्य ओळखत आपला उत्कर्ष साधला. या सोहळ्यात असंख्य भाविक, महीला वारकरी, विणेकरी यांच्यासह गणपततात्या कानडे, झेंडेकरी, गुणवंत भजनी मंडळ आदीसह रामनगर अफजलपुर, लिंबे जळगाव, शिवराई, वाळूजसह महीला वर्ग व भाविकांची उपस्थिती होती. हरी दिनी एकादशी निमित्त हभप संदीपान महाराज (गुरुजी) बाजाठाण यांचे सुश्राव्य हरीकीर्तन सेवा श्रवण करुन उपस्थित भाविकांनी फलहार केला. दरम्यान दिंडीतील वारकरी भाविक यांना नंदकुमार जगताप, नविन शिवराई फाटा व वाळूज येथील सुनिल भाऊ राऊत यांनी चहा दिला.