- लिंबेजळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी,
रामकृष्ण हरीचा गजर

रामकृष्ण हरीचा गजर
वाळूज महानगर – श्रावण वद्य भागवत एकादशी निमित्त जय जय रामकृष्ण हरी, असा गजर करत लिंबे जळगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर (वळदगाव) अशी पायी दिंडी मंगळवारी (ता.23) रोजी काढण्यात आली.
श्रावण वद्य भागवत एकादशी निमित्त मंगळवारी (ता.23) सकाळी 9 वाजता लिंबेजळगांव येथील जागृत हनुमान मंदीर येथुन प्रस्थान होऊन ही दिंडी 11 वाजता पंढरपूर येथे पोचली. तेथे श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. तसेच देवाचिये द्वारी| कीर्तनाची वारी|| या ह भ प विष्णुपंत लोंढे महाराज यांच्या कीर्तन सेवा श्रावणाचा लाभ या दिंडीतील भाविकांनी घेतला. या दिंडी सोहळ्यात मनोज जोशी गुरु, प्रकाश हाडुळे, काकासाहेब हिवाळे, भाऊसाहेब तारक, विणेकरी हभप गणपतराव कानडे, रंगनाथ हिवाळे आदीसह महीलावर्ग व भाविक सहभागी झाले होते.
महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला निघते वारी –
हभप उद्धव महाराज आनंदें, हभप संजय महाराज कुर्हाडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या शुद्ध व वद्य एकादशीला निघत असलेल्या या पायीवारीत असंख्य वारकरी, भाविकांनी सहभाग घेऊन जीवनाचे मुल्य ओळखत आपला उत्कर्ष साधतात.