March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.12) – श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपेने गेल्या चार वर्षांपासून सिंदुरात्मक गणपतीच्या दर्शनासाठी वाळूज महानगरातील लिंबेजळगाव ते शेंदुरवादापर्यंत दर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी पायी दिंडी काढण्यात येत आहे.


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाळूज महानगरातील शेंदुरवादा येथील खाम नदीच्या तीरावर असलेल्या सिंदुरात्मक गणेश मंदिरात दर्शनासाठी जातात. दरम्यान बुधवारी 10 रोजी सकाळी पायी वारी सोहळ्यात रामनगर, गंडेवस्ती, टेंभापुरी, अहील्यादेवीनगर, घुसळेवस्ती, भगतवाडी, राजुरा, सारंगपुर, जळगाव आदी परीसरातील भाविक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दिंडीतील भाविकांना रस्त्यातील ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी फलाहार, चहा, कॉफी, दुध वितरीत केले. ही दिंडी सिंदुरात्मक गणेशाच्या मंदिरात पोहचल्यानंतर दर्शन, अभिषेक व महाआरती करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *