वाळुज महानगर, (ता.7) – वाळूज परिसरातील
रांजणगाव (शेणपुंजी), ता, गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथील 37 वर्षीय वाळू माफियाच्या हायवावर कारवाई न करण्यासाठी 15 हजार रुपयाची लाच घेताना सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश अंबादास नागरे वय 48 हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
नागरे यांनी रेतीचा हायवा सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू देण्यासाठी व त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रति महिना 15 हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वतः शुक्रवारी (ता.7) रोजी स्विकारली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संगीता. एस. पाटील. पोलीस हवालदार, राजेंद्र सिनकर, पोअं, विलास चव्हाण, सी. एन. बागुल यांनी केली.