वाळूजमहानगर (ता.14) : – क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून लहुजी साळवे यांची जयंती सोमवारी (ता.14) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य तथा वळदगावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, पाटोदाचे बबनराव पेरे, वळदगावचे सुभाष साबळे, पंढरपूरचे माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, उद्योजक संजय मिसाळ, माजी सरपंच कांतराव नवले, राजेश पवार, दीपक कानडे, लखन सलामपुरे, दीपक साबळे, प्रकाश सौदागर, शिवाजी झळके, मयूर ठाकूर, बाबासाहेब वक्ते, रोशन शहा, बाबा लांडे, आदित्य साबळे आदींसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.