वाळूजमहानगर, ता.21 – प्रथम ओळख करून घेतली व नंतर प्रपोज करत मोठमोठे आमिष दाखवले. मात्र तो खोटे बोलत असल्याची खात्री होताच ती दूर गेली. त्यानंतर तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जगू देणार नाही. अशी धमकी (19 वर्षीय) विद्यार्थिनीला दिल्याने तीने पोलिसात धाव घेत सोमवारी (ता.20) रोजी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनी फार्मसी चे शिक्षण घेते. तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिच्याच वर्गात शिकणारा आरोपी पियुष स्वामी भागवत (वय-23) रा. बेगमपुरा याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्यासोबत जवळीक निर्माण करुन प्रपोज केले. दोघे बाहेर फिरायला गेले, तेथे फोटोही काढले. विशेष म्हणजे त्याने तिचे पॅन कार्ड, शाळेचा दाखला व गुणपत्रक बजाजनगर येथे येऊन बळजबरीने घेऊन गेला. मोठमोठे आमिष दाखवणे, वारंवार खोटे बोलणे. याची खात्री होताच ती पियुष पासून दूर गेली. त्यामुळे पियुष भागवत याने फिरण्याकरीता बाहेर गेलेल्या ठिकाणीचे सोबतचे दोघांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. व 1 जानेवारी पासुन तो ती शिक्षण घेत असलेल्या फार्मासी येथे येवुन तिला वारंवार फोन करुन पाठलाग करत आहे. तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जगू देणार नाही. अशी धमकी देतो. तसेच तिच्या आई-वडिलांना सुद्धा फोन करून जीवे मारण्याची धमकी देत आहे. सोमवारी (ता.20) रोजी रात्री 9 वाजता पियुष, त्याची आई रेखा भागवत, वडील स्वामी भागवत हे पीडित मुलीच्या राहते घराच्या गल्लीत आले आणि गोंधळ घालत तुझी बदनामी करणार, तुम्हाला पाहुन घेऊ. अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.