February 22, 2025


वाळूज महानगर, (ता.13) – इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या 21 वर्षीय तरुणीचा मोबाईल नंबर घेवुन मैत्री केली व लग्नाचे अमिष दाखवुन आनाभाका घेत रांजणगाव (शेणपुंजी), बजाजनरव व पडेगाव येथे वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार देवुन जीवन बर्बाद करण्याची धमकी दिली. तब्बल तीन वर्ष सुरू असलेल्या या प्रकरणा प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.13) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी वैभव जोंधळे रा. परभणी हमु. पवननगर, रांजणगाव (शेणपुंजी) एम आय डी सी, वाळूज याची पडेगाव येथील 21 वर्षीय पीडीत तरुणीशी इंस्टाग्रामवरून 2019 मध्ये ओळख व मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते बरेच दिवस इन्स्टाग्रामवर चॅटींग करीत होते. त्यांनतर दोघानीही एकमेकाचे मोबाईल नंबर घेतले. 18 फेब्रुवारी 2020 किंवा 2021 मध्ये जोंधळे याने पीडित तरुणीला फोनकरून रांजणगाव येथे बोलावून घेतले. व आणाभाता घेत लग्नाचे आमिष दाखवले. आणि वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला.


लग्नाच्या तगाद्यामुळे फिरवली पाठ
तीन वर्षे सुरू असलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर लग्नाबाबत वैभव जोंधळे हा तिला उडवउडवीची उत्तरे देत असे. त्याला वारंवार विचारणा केली असता तीला भेटण्यास व बोलण्यास टाळाटाळ करू लागला. 20 सप्टेंबर रोजी तिने वैभवला फोन करून लग्नाबाबत विचारले असता, त्याने शिवीगाळ केली व मी आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तुला काय करायचे ते कर व जर तु पोलीसात माझी तकार केली. तर तुझे जगणे मुश्कील करून टाकेल, तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली. अखेर वैभवने आपली फसवणुक केली. असे लक्षात येताच पीडित तरुणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या ठिकाणी केला बलात्कार –
रांजणगाव (शेणपुंजी) येथील साई हॉटेल व लॉजवर, वैभव जोंधळे यांच्या घरी तसेच जुन 2023 मध्ये बजाजनगर येथील एका कॅफेमध्ये वैभव जोंधळे याने कॉपी पिण्याच्या बहाण्याने घेवुन गेला व तेथेसुध्दा तिचा हात त्याचे हातात घेवुन तुझ्यावर माझे खुप प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणुन तीला विश्वासात घेवुन कॅफेमध्येच बलात्कार केला.

 तीन वर्ष सुरू होता प्रकार
9 सप्टेबर 2023 रोजी वैभव जोंधळे हा पीडित तरुणीच्या घरी पडेगाव येथे गेला. त्यावेळी तिने त्यास लगनाबाबत विचारले असता, तु माझ्यावर भरोसा ठेव जर तुझे घरचे आपल्या लग्नाला नाही म्हटले. तर आपण पळुन जावु. अस म्हणुन त्याने विश्वास संपादन करून शरीरसंबध केले. जवळजवळ तीन वर्ष हा प्रकार सुरू होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *