March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) -वाळूज परिसरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून शिर्डीला पळवून नेऊ, तेथे तीचा मानसिक व शारिरिक छळ केल्याची घटना बुधवारी (ता.17) रोजी उघडकीस आली.


वाळूज परिसरातील एकोणावीस वर्षीय तरुणी कुटूंबासह राहते. तीचे गावातच ब्युटी पार्लर आहे़. गेल्या काही दिवसापूर्वी तीच्या ओळखीचा भुषण साळवे याने तीला प्रेमात ओढण्याचा प्रत्यन केला होता. याबाबद तीने तीच्या आई वडीलांना सागितल्यानंतर त्यांनी त्याला समाजावून सांगितले होते. मात्र तरीही भुषण हा तीच्या मागावर होता. 31 डिसेंबर 2023 रोजी सायकांळी 6 वाजेच्या सुमारास भुषण हा तीच्या ब्युटी पार्लरसमोर आला व तिला इशारा करून बाजूला बोलवून घेतले. त्यानंतर त्याने तुझे फोटो माझ्याकडे आहे. ते मी तुझ्या नातेवाईकाना पाठवेल व बदनामी करील. अशी धमकी देत मी तुझ्या सोबत लग्न करीन, तु माझ्या बरोबर चल. नाहीतर तुला व तुझ्या आई वडीलांना जीवे मारीन. अशी धमकी दिली. त्यानंतर भुषणने तीला सोबत घेऊन शिर्डी येथे घेऊन गेला. तेथे लग्नाचे अमिष दाखवून तिचा शारिरिक व मानसिक छळ केला. तसेच जर तु माझ्या विरोधात तक्रार दिली. तर मी तुला सोडणार नाही. अशी धमकी दिली़ त्यामुळे सिमा हि काही दिवस गप्प होती. त्यामुळे तरुणी गप्प होती. मात्र शेवटी तीने धिर धरत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भुषण साळवे याच्या विरूध्द बुधवारी (ता.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. प्रविण पाथरकर करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *