March 23, 2026

       मामी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा

वाळूज महानगर – पतीपासून वेगळे राहणाऱ्या 34 वर्षीय मामीला 25 वर्षीय भाच्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. मात्र त्यानंतर तिला मारहाण करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरीने तिच्याकडून सहा हजार रुपये घेऊन तो फरार झाला. मामी आणि भाच्याच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला.


  • याबाबत पोलीस आयुक्तांना लेखी दिलेल्या तक्रारीचा आशय असा की, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली येथील 34 वर्षीय महिलेचा 2005 मध्ये विवाह झाला. गावाकडे काम धंदा नसल्याने दोघे पती-पत्नी वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे आले. तेथे ते कंपनीत काम करत होते. दरम्यान दोघा पती-पत्नीत पटत नसल्याने 34 वर्षीय महिला स्वतंत्र रूम घेऊन वेगळी राहत होती. त्यावेळी तिचा 25 वर्षीय भाचा विशाल सुभाष दीपके रा. हापसापुर ता. वसमत जि. हिंगोली हा तिच्याकडे आला. ती पती पासून अलग असल्याचे पाहून त्याची नीतिमत्ता व वाईट नजर तिच्यावर होती. एक दिवस त्याने तुम्ही मला खूप आवडता, मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही मामापासून फारकत घ्या, मी तुम्हाला आयुष्यभर तुमच्या मुलासह सांभाळतो. अशी विनंती करून अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यावर मामीने त्याला आपण नात्याने मामी भाचा आहोत. माझे लग्न झालेले आहे, मला दोन अपत्य आहेत. तुम्ही तुमचे लग्न करून तुमचा संसार थाटा व सुखात रहा. असा सल्ला दिला. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. एके दिवशी दोन्ही मुले शाळेत गेल्याची संधी साधून तो तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करून नको म्हणत असताना तिच्यावर बलात्कार केला. तसेच सुकेश आळने, रवी दीपके, बबन दिपके यांच्यासमोर वचन देऊन, मी तुझ्याशी कायदेशीर लग्न करतो, तू घाबरू नको असे म्हणून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिने लग्नाचा तगादा लावला असता, तु जर शारीरिक संबंध ठेवले नाही, तर मी तुझे अश्लील फोटो समाजात सोशल मीडियावर व्हायरल करीन. असे म्हणून तिच्यासोबत सतत शारीरिक संबंध ठेवायचा. व लग्न करण्यास टाळाटाळ करून जीवे मारण्याची धमकी द्यायचा. दरम्यान दोघेही त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता तेथेही त्याच्या आई-वडिलांनी व मावस भावाने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र सर्वांनी समजावून सांगितल्यानंतर विशाल दिपके हा लग्न करण्यासाठी तयार झाला. त्यानंतर दोघेही तिच्या पतीकडे गेले आणि शंभर रुपयाच्या बॉण्डवर फारकत लिहून घेतली. त्यानंतर दोघेही छत्रपती संभाजीनगर येथे येऊन पती-पत्नी सारखे राहू लागले. 21 ऑगस्ट 2025 रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने विशाल दिपके याने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या जवळचे सहा हजार रुपये घेऊन तो निघून गेला. दरम्यान त्याने तिचा फोन ब्लॅकलिस्टमध्ये. त्यामुळे त्याला व्हॉइस कॉल केला असता, मी तुझ्याकडे येणार नाही. तुला काय करायचे ते कर, माझे कोणी काहीही करू शकत नाही. असे म्हणाला. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.


याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 ऑगस्ट 2025 रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तिने 8 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले. त्यावरही तिचे समाधान न झाल्याने पुन्हा तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेत फिर्याद दिल्याने आरोपी विशाल दिपके याच्या विरुद्ध 21 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल टी के शिंदे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *