February 22, 2025


वाळूजमहानगर – रुग्णांना आरोग्य सेवा पुरवत असतांना डॉक्टरांनी रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणून आत्मीयतेने आपले कर्तव्य बजावत हा व्यवसाय यशस्वी केला पाहीजे. मार्गदर्शनपर सल्ला पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी बजाजनगर येथे लघाणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व लिलासन्स हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता.16) रोजी दिला.

बजाजनगर येथे डॉ. सुनिल लगाने व सुमन हाँस्पिटल यांच्या उपक्रमाऊन लघाणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल व लिलासन्स हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता.16) रोजी थाटात संपन्न झाला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे मार्गदर्शन करीत होते यावेळी ते पुढे म्हणाले की, बजाजनगरचा परिसर हा दिवसेंदिवस लोकवस्ती, उद्योगधंद्यामधून विस्तार होत आहे.

दिवसेदिवस रोगप्रतिकार शक्ती कमी होत चालल असून आरोग्य विषयक समस्या निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत डॉ. सुनिल लघाणे व त्यांच्या सहकारी डॉक्टरच्या माध्यमातून या हॉस्पीटल मध्ये योग्य असे उपचार होतील व रुग्णांना अल्पदरात सर्व सुविधा मिळतील. ही बाब परिसरातील नागरीकांसाठी सुखद आनंद देणारी आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार संजय सिरसाट, हरीशचंद्र लघाणे, बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, शिवाजी बनकर पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार संजय सिरसाठ, आमदार राजेश टोपे, डॉ. संजय पाटणे, तनसुखजी झांबड यांचे समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुनित लघाणे यांनी केले. संचालन अनिल गरड यांनी तर आभार घनशाम चव्हाण यांनी मानले. हा उद्घाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवाजी सोणटक्के, रविंद्र सोनूणे, डॉ. अक्षय लघाणे, डॉ भंडारी, डॉ. मोहरीर, डॉ. वाघ मनोर, डॉ. काला, डॉ वैद्य, गणेश गिरी, संजय करपे, संतोष गुंजारे, राम काकडे, फुलचंद गायकवाड, डॉ. रायते, डॉ राजेंद्र लघाणे, डॉ बावीस्कर, प्रशांत ठाकुर, अमोल ठाकुर, राम कदम यांच्यासह सचिन करपे व कर्मचारी यांनी विशेष परीक्षण घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *