वाळूजमहानगर, (ता.18) – हिशोबाच्या पैशाच्या देवाण – घेवाणवरून हुज्जत घालून एका रिक्षा चालकाने महिलेस शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी बुधवारी (ता.15) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास वडगावात घडली.
सिमा चांदु धुळे (45, रा.वडगाव (को.) यांनी त्यांच्या मालकीची रिक्षा (एम एच 20, ईएफ-6491) ही भाडे तत्वावर श्रीराम बाप्पासाहेब नागरे रा.बामणगाव, ता. याला चालविण्यासाठी दिलेली आहे. रिक्षाचालक श्रीराम नागरे हा दररोज रिक्षा चालवुन सांयकाळी बचतीचे पैसे रिक्षामालक सिमा धुळे यांच्याकडे जमा करीत असत. अशातच बुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रिक्षाचालक श्रीराम नागरे हा रिक्षा घेऊन घरी आला असता त्यास मालक सिमा धुळे यांनी बचतीचे पैसे मागितले. पैसे मागितल्याच्या कारणावरुन रिक्षाचालक नागरे यांने रिक्षामालक सिमा धुळे यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. यावेळी सिमा धुळे यांनी चालक नागरे यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काठीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर नागरे हा घटनास्थळावरुन पसार झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या सिमा धुळे यांना अहिल्याबाई कांबळे यांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आरोपी रिक्षाचालक श्रीराम नागरे याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.धिरज काबलिये हे करीत आहेत.