March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.16) – सोलापूर अल्ट्रा आजादी रन 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने 78 किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर मधील अल्ट्रा रनर राहुल आहेर यांनी मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपला सहभाग नोंदवून सोलापूर येथे तिरंगा ध्वज हातात धरून 78 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केली.
ही मॅरेथॉन दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता चालू झाली होती. ती त्यांनी 15 ऑगस्ट तारखेला पहाटे 3 वाजता पूर्ण केली. या मॅरेथॉन मध्ये 78 किलोमीटर रन करत असताना रात्री एक ते तीन च्या दरम्यान त्यांना पावसाचा सामना करावा लागला तरी देखील न थांबता त्यांनी भारतीय ध्वज हातात घेऊन 78 किलोमीटर सोलापूर अल्ट्रा आजादी रन पूर्ण केला. यात उमेश जगताप यांनी देखील आपला सहभाग नोंदवला. यानंतर सोलापूर येथील महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
मसिआ संघटना, उद्योजक तसेच गुरुद्वाराचे अध्यक्ष रणजीत सिंग गुलाटी, आई, वडील, बहिण, शुभ प्रभात ग्रुप, कर्नल प्रकाश वहाडणे, एन एक्स नवघणे, ओमकार सोसायटी, सोलापुर येथील चंद्रशेखर गायकवाड व अतिश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश राहुल आहेर यांनी संपादन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *