February 21, 2025

वाळूजमहानगर, ता.24- वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील राजर्षी शाहू विद्यालयाच्या खेळाडूंनी खोखो स्पर्धेत  रोमहर्षक कामगिरी करून सुवर्णपदक मिळविल्याने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


कोल्हापूर येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय (नॅशनल) खो-खो स्पर्धेत शालेय 14 वर्षा खालील मुलांच्या स्पर्धे मध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत असताना राजर्षी शाहू विद्यालय रांजणगाव (शे.पु.) छत्रपती संभाजीनगरच्या संघाने रोमहर्षक कामगिरी केली. या स्पर्धेत सार्थक डोंगे व शुभम पोले यांनी सुवर्णपदक मिळवले. संस्थेचे सचिव विकास सवई व विद्यालयाचे प्राचार्य अशोक चेडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत खेळाडूंचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक प्रमोद गुंड यांचे स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *