March 23, 2026

 


वाळुज महानगर, (ता.18) – वाळूज महानगरातील श्री गुरुदेव सेवाश्रम ग्रामगीता अध्ययन केंद्र, बजाजनगर येथे मंगळवार 15 जुलै रोजी सायंकाळी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज चरण पादुका दर्शन सोहळा उत्साह व भक्तिमय वातावरणात झाला.

दरवर्षीआषाढी एकादशी निमित्त राष्ट्रसंतांच्या चरण पादुका पालखी पंढरपूर जि सोलापुर येथे नेण्याची परंपरा आहे. ही पालखी गुरुकुंज मोझरी जि अमरावतीकडे परत जाताना चरण पादुका पालखीचे बजाजनगर येथे मंगळवारी 18 जुलै रोजी आगमन झाले होते. यानिमित श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर सभागृहात सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, भजन,पादुका पूजन, दर्शन, प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन, राष्ट्रीय किर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम घेण्यात आले. चरण पादुका पूजन अनिकेत देशमुख व शंतनु कराळे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले. याप्रसंगी पालखी व्यवस्थापन प्रमुख राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सुशील महाराज वणवे आणि पालखी सोबत आलेले सहकारी, जीवन ज्योती सामाजिक विकास संस्थाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, सौ. संतोष चंद्रप्रकाश त्रिपाठी, अनिल भैय्या चोरडिया, श्री गुरुदेव सेवा मंडळ मराठवाडा विभाग सेवाधिकारी मनीष जैस्वाल, शासकीय तंत्र निकेतनचे विभाग प्रमुख डॉ संजय पाचकोर, माजी जि. प. सदस्या रेखा नांदुरकर, श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला शाखा बजाजनगरच्या अध्यक्षा रेखा हिंगणकर आदि प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगरचे अध्यक्ष अनिल अर्डक होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ ठाकरे यांनी, सूत्रसंचालन उत्तम वझळे यांनी तर आभार गजानन मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज चरण पादुका उत्सव समिती 2025, श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ बजाजनगरचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *