February 23, 2025

टाकळीवाडी ता. गंगापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांच्या विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा मंगळवारी (ता.8) रोजी करण्यात आला. विशेष म्हणजे माने यांच्याकडे कोणतीही सत्ता नसतानाही त्यांनी हे विशेष प्रयत्न करून गावाचा पाणी प्रश्न सोडवला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संतोष माने, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी दादा बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर नीळ, टाकळी टाकळीवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी चंदेल, शिवाजी काळे, अशोक गायकवाड, हिरालाल जारवाल, उपसरपंच देवधन घुसिंगे, संदीप थोरात, पांडुरंग कापसे, चंद्रकांत चव्हाण, शाहरुख पटेल, अजय सोनवणे, उद्दलसिंग जारवाल, चरणसिंग जारवाल, गणेश कजबे, नागेश पवार, सागर शेलार, विशाल पुसे, अमोल भवर, गणेश जारवाल, भरत जारवाल, अनिल गुसिंगे, कार्तिक सुंदरडे, विशाल नरोडे, विशाल गुसींगे, भगवान बनगे, जयसिंग जारवाल व समस्त गावकरी उपस्थित होते.
……….

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *