
वाळूज महानगर, (ता.3) : रामनवमीनिमित्तवाळूज येथील मेटलमॅन ऑटो कंपनी व ग्रुप ग्रामपंचायत जांभळी यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेकडी येथे गुरूवारी (ता.30) रोजी रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे पाटील यांच्या हस्ते व मेटलमॅन ऑटो कंपनीचे सी.ओ.ओ. श्रीकांत मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरामध्ये 107 रूग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली व त्यातील 4 रुग्ण मोतीबिंदूचे आढळले. त्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी लायन्स क्लब रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रक्तदान शिबिरात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढीने रक्त संकलन केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेटलमॅन ऑटोचे अनिलकुमार डहाळे, एच आर प्रमुख विजय साळवे, कृष्णकांत बीजमवार, प्रकाश एंखडे, आशिष शर्मा, श्यामबाग साहेब, प्रविण जोशी, सरपंच अमोल कळसकर, सुधाकर गाडेकर, दत्ता महाराज, सुनील महामुनी, किशोर जगताप, नारायण निकम, गुरूदास प्रराते, संतोष जाधव, रवी पेठशिवनीकर, राजेश मानकर, महेंद्र तेली, कैलास चव्हाण, रोहा चव्हाण, मोरे निवृत्ती, घोरपले अण्णा, नारायण खोले, महेश पाटील, आर एस मानकर, काकासाहेब केरे, हबीब बेग, अशोक गुढ्ढे, दिनेश लाडे, अशोक खेडकर, सचिन पवार, गणेश जाधव, योगेश भतेकर, सुनील देवळे, सचिन घोडके, बाळासाहेब नाटकर, विश्वनाथ देशपांडे, शिवाजी कराळे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत शिंदे यांनी केले. तर अतुल भास्कर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
