वाळूजमहानगर – राजा शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान शिवाजीनगर, वाळूजच्या वतीने संस्कृती रास दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध स्पर्धा घेण्यात असून दररोज मोठमोठ्या बक्षीसांची लय लूट महिला व मुली करत आहे.
या प्रतिष्ठानची स्थापना 2018 साली करण्यात आली. वर्षभर विविध कार्यक्रमाचे या प्रतिष्ठांच्या वतीने आयोजन करण्यात येते.
यात सर्वात मोठा कार्यक्रम हा शिवजयंतीचा असतो. त्याचप्रमाणे रास दांडियाचेही आयोजन करण्यात येते. संस्थापक अध्यक्ष रवी आढाव पाटील व त्यांच्या मित्र परिवाराने या दांडिया महोत्सवाची सुरुवात केली. हे प्रतिष्ठान प्रत्येक वर्षी अध्यक्ष पद हे वेगवेगळ्या व्यक्तीला देतात.
- यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या रास दांडिया उत्सवात विविध बक्षिसांची लय लूट होत आहे. परिसरातील महिला, मुली या दांडीयात आवर्जून सहभाग घेत असून देवीदेवतांच्या गाण्यावर दांडीयाचा लयबद्ध
ठेका धरत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भैया पठाण (अध्यक्ष – संस्कृती रास दांडिया), रवी आढाव पाटील (संस्थापक अध्यक्ष राजा शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान) उपाध्यक्ष – दीपक साबळे, ललित राऊत, व्यवस्थापक- निलेश बनकर पाटील, विक्रम सोळंके पाटील, विशाल भुजंग, शंकर सुसे, गजानन गडगुळ, राहुल खर्माटे परिश्रम घेत आहे.