March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा तथा हिंदू जन नायक राज ठाकरे हे पुढील महिन्यात मराठवाडा दौऱ्यावर येत असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते व्यापक स्वरूपात आंदोलनाच्या तयारीत आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी दिली. त्यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, हिंदू जण नायक राज ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्याचा प्रश्नावर चर्चा केली. सुशिक्षित बेरोजगारी यावर चर्चा करून बेकारी भत्ता चालू झाला पाहिजे. यासाठी म न से विद्यार्थी सेनेकडून लवकरच आंदोलन उभे कराव लागेल. अशीही चर्चा झाली. राजसाहेब जून महिन्यात मराठवाडा दौरा करून 40 तालुका ठिकाणी जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पाटील यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *