
वाळुज महानगर – बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शनिवारी 3 जानेवारी रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक इलियास पठाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव गायकवाड, राजन सोमासे, प्रवीण राजे, विजयकुमार कोऱ्हाळे, सोनल वैष्णव, सुकेशनी शेगावकर, ज्योती बोडके, सपना साबळे, योगिता बनकर, विद्यालय मुख्यमंत्री समृद्धी पेंढारकर या होत्या. यावेळी इयत्ता सहावी वर्गाच्या विद्यार्थिनीं सिद्धी बारगळ व जान्हवी करे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता म्हटली व इयत्ता दहावीची विद्यार्थिनी स्वामिनी कुलकर्णी हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पठाण यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरमसिंग जारवाल यांनी केले. तर आभार विनोद शिंदे यांनी मानले.
