March 23, 2026


वाळूज महानगर,(ता.1) – बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालययात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाहतूक पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण गिरी व पठाण यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना वाहतुकीविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थिनीं सोबत चर्चा केली. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विमल जाधव, उपमुख्याध्यापक ई.डी. पठाण, राजन सोमासे, उमेश डावखर, विनोद शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे आर. एस.पी. विभाग प्रमुख डी.टी .जारवाल यांनी केले तर आभार बि.जी गायकवाड यांनी मानले. तसेच कार्यक्रमास विद्यालयातील इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *