वाळूजमहानगर, (ता.27) – बजाजनगर येथील राजा शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल 98 टक्के लागला असून प्रथम क्रमांक ओमकार प्रदीप दीक्षित 95.20,
द्वितीय गायत्री हनुमान रोडे 94.60, तर
तृतीय क्रमांक प्रीती प्रभाकर बिडवे 91.20. चौथा पुनम रामेश्वर पवार 90.60, पाचवा शुभांगी शिवाजी सुरवसे 90.20 हे विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव अमन जाधव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही .के. जाधव, ई. डी. पठाण, प्राथमिकचे मुख्याध्यापक कैलास घायवट, बी. गायकवाड, राजन सोमासे, विनोद शिंदे, सोनल वैष्णव, कृष्णा ठमके, धरमसिंग जारवाल, वाल्मिक गायकवाड, उमेश डावखर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.