वाळूजमहानगर, (ता.21) – भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचालित, बजाजनगर येथील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही 12 वी बोर्ड परीक्षेत नेत्रदिपक यश संपादित करून यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत वाणिज्य शाखेची प्राची धनंजय पटकरी या विद्यार्थिनीने 97.33 गुण मिळवून गंगापूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर विज्ञान शाखेतून नील काला 94.17 व पलक जैन यांनी 94.17 टक्के गुण मिळवून वाळूज महानगरातून प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञान शाखेतील गायके दुष्यंत दत्ता यांनी 92 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, आयुष काला 90.67 गुण मिळवत तृतीय क्रमांक तर कलश कासलीवाल 90.50 गुण मिळवत चौथा क्रमांक घेतला आहे.
महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी श्रेया मुसमाडे 90 टक्के, अदिती तिवारी 90 टक्के, जाभाडे श्वेन्जल 88.17, निकिता फांदाडे 88.17, पल्लवी राजपूत 86 टक्के, अमर हैबती 85.33, गायत्री साळुंखे 85 टक्के, ऋतुजा अंदुरे 84.33, अदिती ढेंबरे 84 टक्के, दिव्या चव्हाण 83.67 गुण मिळवत उज्वल निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. वाणिज्य शाखेतून मोरे प्रतिभा राजेंद्र 86.83 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कोमल साईनाथ सुपेकर 86 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेचा जाधव शिवम 83 टक्के गुण मिळवून प्रथम, स्नेहा बर्डे या विद्यार्थिनींनी 82 टक्के गुण मिळवून द्वितीय तर व्यवहारे गायत्री या विद्यार्थिनीनी 81 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
महाविद्यालयाचा निकाल 95.39 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 99 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 95 टक्के व कला शाखेचा निकाल 78 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसचिव अमन जाधव, प्राचार्य व्ही.के. जाधव उपप्राचार्य, डॉ. एस. एस कादरी, प्रशाकीय अधिकारी बी.बी.जाधव, विलास मालोदे राधाजी जाडे, एन.डी. कवडे आदीनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.