March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.15) – सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मोत्सवाप्रमाणे पुण्यतिथीलासुद्धा पाचाड (रायगड) येथे लाखो समाज बांधवांनी मानवंदना करण्यासाठी आले पाहिजे. असे आवाहनपर मार्गदर्शन जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रेचे आयोजक शिवाजीराजे जाधव यांनी लिंबे जळगाव येथे रविवारी (15 जून) रोजी केले.

जिजाऊ जन्मोत्सवाला लाखो लोक येतात. मात्र पुण्यतिथीला शंभर, पन्नासच लोक असतात. कारण जिजाऊंची समाधी पाचाड (रायगड) येथे आहे. हे लोकांना माहिती नाही. सर्वांना माहिती व्हावी. म्हणून मातृतिर्थ सिंदखेड राजा ते पाचाड (रायगड) जन्मस्थळ ते स्मृतीस्थळ राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रा प्रत्येक वर्षी (15 जुन ते 17 जुन) काढण्यात येते.

यंदा या यात्रेचे चौथे वर्ष आहे. या यात्रेचे लिंबेजळगाव येथे दिलीप बनकर पाटील परिवाराच्या वतीने स्वागत करून यात्रेतील भाविकांची भोजन व्यवस्था केली.

यावेळी दिलीप बनकर पाटील म्हणाले की, दरवर्षी जिजाऊंची जन्मभूमी शिंदखेडा राजा ते पुण्यभूमी पाचाड (रायगड) येथे जिजाऊ अभिवादन यात्रा जात असते. ही यात्रा 15 जून रोजी संभाजीनगरातील लिंबे जळगाव येथे आल्यानंतर बनकर परिवाराच्या वतीने यात्रेचे स्वागत व यात्रेतील भाविकांना भोजन व्यवस्था करण्यात येते.

जिजाऊंच्या पुण्यतिथी निमित्त हे पुण्यकर्म करण्याचा योग बनकर पाटील कुटुंबाला लाभतो. दरवर्षी या यात्रेत शेकडो तरुण व शिवप्रेमी सहभागी होतात. या यात्रेतील शिवप्रेमींची संख्या वाढली पाहिजे. कितीही संख्या वाढली तरी बनकर कुटुंब या यात्रेच्या स्वागतासाठी कमी पडणार नाही. असेही दिलीप बनकर पाटील यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास योगेश देशमुख, दत्ता घुले, वाजेद खान, महेश पवार, यश बावणे, शंभुराजे जाधव, सुभाष जाधव, प्रशांत सोनोने, बाबासाहेब शिंदे, नंदकुमार गांधीले, गणेश गायकवाड, उत्तमराव बनकर, पाराजी चितळे, सागर बनकर, ज्ञानेश्वर गावंडे, वसीम पटेल, सुरेश गावंडे, तात्यासाहेब भोसले, अंकुश गावंडे,

अफसर पटेल, अशोक बनकर, युनुस पटेल, रामदास प्रधान, रमेश प्रधान यांच्यासह लिंबे जळगाव, वाळूज, बजाजनगर, तुर्काबाद (खराडी), आंबेलोहोळ, गाजगाव परिसरातील शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *