वाळूजमहानगर (ता.22) :- वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील सुधाकर ससाने या कार्यकर्त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ससाने यांच्या कुटुंबीयास भेट देऊन त्यांचे सात्वन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद बोर्डे, जिल्हा सहसचिव अशोकराव खिल्लारे, जिल्हा सदस्य संघराज धम्मकिर्ती, अशोकराव कानडे, बाबासाहेब वक्ते, गंगापूर तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, तालुका महासचिव बाबासाहेब दुसीग, तालुका पदाधिकारी आरक, व रांजणगाव सर्कल अध्यक्ष अमोल भालेराव, महीला आघाडीच्या बर्फेताई, अशाताई मोरे, सीमा भंडारे आदी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ससाने कुटूंबाची भेट घेवून मयत सुधाकर ससानेचे पत्नी मिरा सुधाकर ससाने, भाऊ प्रकाश कुंडलीक ससाने, सुभाष ससाने यांचे सांत्वन केले. व घडलेली घटनेची माहीती घेत ही संपुर्ण माहीती बाळासाहेब आंबेडकर यांना देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी कुटुंबातील नातेवाईक यांना सांगीतले. आणि न्याय मिळेपर्यंत पक्ष कुटुंबाच्या मदतीला बांधिल आहे. असेही म्हणाले.