March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.3) – रांजणगाव शे पूं येथील कमळापूर रोड वरील नूरानी मस्जिद जवळ गोवंशाचे मास बाळगताना पोलिसांनी तिघांना पकडले. एम आय डी सी वाळूज पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलेसह एका पुरुषा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई 31 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास केली.गोवंश जातीचे मास विकण्यास बंदी असताना तेथे शेख खालीप शेख शफीक (वय 35), सईदा शेख (वय 58) व नजमा बशीर कुरेशी (वय 54) रा.रांजणगाव यांच्या ताब्यातून पोलिसांनी 9 हजार 300 रुपये किमतीचे एकूण 48 किलो मास जब्त केले. पुढील तपास एम आय डी सी वाळूज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस हवालदार गिरी करत आहेत.
———————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *