वाळूजमहानगर, ता.4 – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज व बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे जयंतीनिमित्त शाळेद्वारे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम रांजणगाव (शे.पू) परिसरातील दत्तनगर फाट्यावरील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच योगिता प्रभाकर महालकर व महिला पालक उपस्थित होत्या. रॅलीमध्ये वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी, झांज पथक, लेझीम पथक, नृत्य व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित पथनाट्य सादरीकरण करून मुलींच्या शिक्षणाबद्दल जनजागृती करण्यात आली. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचाराचे ग्रीटिंग कार्ड स्वतः तयार करून रॅली दरम्यान नागरिकांना वाटप करून वेगळा उपक्रम केला.

त्यानंतर शाळेत दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष आय.जी.जाधव, संस्थेचे सचिव हारीश जाधव, पालक प्रतिनिधी राहुल खुणे, प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक मुख्याध्यापक हनुमंत जाधव, प्राथमिक विभाग प्रमुख मनीषा नवथर, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भाऊसाहेब शिरसाट, रेखा बिदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ओजस्वी लोहार, शुभ्रा नरवाडे पायल शिंदे, स्वप्नाली नरवाडे सोळंके परिनिती, प्रिया रगडे आम्रपाली पगारे, अनुष्का पांचाळ,श्रावणी डहाळके, अनुजा देवरे, श्रुती बनकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर जागृती समुद्रे, राजरत्न गवळी या विद्यार्थ्यांनी गीत गायले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब मोहिते तर आभार परमेश्वर गिते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक कल्याण कुलकर्णी, अशोक तारडे, संदीप हिंगणकर, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सुनील शिंदे, उल्हास वाघ, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, स्वाती सूर्यवंशी, अनुराधा मुळे, छाया वागदरे, स्वाती पाटील, शुभांगी नेरपगारे, रोशनी नेरपगार, दीपक पठारे, पूजा,वैशाली राठोड, डिंपल टोके, विनय अवसरमोल, अस्मिता तायडे, सुरेखा शिंदे,अर्चना बुर्जे, लता वैष्णव, पूजा खोतकर, ममता खोतकर, अंकिता वाघ, मयुरी चव्हाण, रोहिणी शेळके, अश्विनी कुलकर्णी, वैशाली राठोड आदींनी परिश्रम घेतले.
