March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.1)- वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील गोविंद कॉलनीत नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेच्या वतीने सलग 13 वर्षापासून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षाचा 375 वा कार्यक्रम 27 मार्च रोजी मोठ्या उत्साहात घेण्यात आला. यानिमित्ताने संस्थेतर्फे गाथा पारायण, काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी ह.भ.प.सिताराम महाराज मते नांदेडा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या सदस्यांना नामस्मरण करणे, व्यसनमुक्त राहणं, संघटित राहणं ही काळाची गरज आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून केशव पाटील नंदनवनकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा मित्र मंडळ, ही सामाजिक संस्था समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्रभर माणुसकीचा झरा जपण्याचं काम करीत आहे. त्यांचे अनुकरण इतर संस्थांनी केले पाहिजे. असे मते मांडले.

यावेळी गाथा पारायण प्रमुख ह.भ.प.कल्याण महाराज सोनवणे, ह.भ.प.आनंद महाराज जाधव, संत श्री सावता महाराज भजनी मंडळ, नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक केशवराव वानखेडे, उत्तम केंद्रे, पांडुरंग वडजे, शिवाजी कदम, दत्ता जाधव, डॉ मंगेश कागणे, पंडित शिंदे, चंद्रशेखर माने, अण्णासाहेब कुंभारे, हनुमंत दासरवाड, अनिल दिग्रसकर, तुकाराम जाधव, मारुती नरवाडे, संदीप गोगे, दत्ता पवार उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी साहेबराव वाघमारे, माधव फाजगे, कुशब येरेकर, तुळजासिंह ठाकुर, विठ्ठल ढगे, शंकर इंगळे, कपिल गंगोत्री आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *