
वाळुज महानगर, (ता.27) – श्री शिव सत्यश्वर महादेव मंदिर, देवगिरी कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी) येथे संगीतमय श्री शिवपुराण कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार 28 जुलै ते गुरुवार 7 ऑगस्ट पर्यंत दररोज सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत होणाऱ्या या संगीतमय श्री शिव पुराण कथा सोहळ्यात ह.भ. प. माधव महाराज सेनगावकर हे कथा वाचन करणार असून ह.भ. प. संतोष महाराज सुतार व त्यांचे सहकारी त्यांची संगीत साथ संगत करणार आहेत. यासोबतच श्री महारुद्र अभिषेक व श्री शिव नाम जप करण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
