
वाळूजमहानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथे गंगापूर पंचायत समिती शिक्षण विभाग व श्री गजानन विद्या मंदिर, बसवंतराव पाटील इंग्रजी माध्यम व श्री गजानन ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन भरविण्यात आले होते.

यामध्ये 6 वी ते 12 वीच्या शाळांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी समाधान आराख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल सकदेव, जिल्हा परिषद सदस्य उषाताई हिवाळे, वाळूज केंद्रप्रमुख देविदास सूर्यवंशी, विलास गायकवाड, मनोज मुताळे, रामकीसन पांचाळ, मुपटाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण हिवाळे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, मीरा देशपांडे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी एस एम हिंगणकर, प्रा संजय तुपे, बी व्ही शिरसाट, एच बी जाधव, के कुलकर्णी, एन एस रेलेकर, पी व्ही गीरी, आर व्ही जाधव, एस सी मंगनाळे, एस टी मुळे, ए आर चिकाळे, एस पी थोरात, एम सी कांबळे, पी एस नरवडे यांच्यासह शिक्षक आणि शालेय विद्यार्थी व पालक उपस्थित होते.