वाळूजमहानगर (ता.7) :- वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख व्याख्यानकार प्रदीप माळी यांनी पोस्टर प्रदर्शनाद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम यावर रविवारी (ता.6) रोजी सविस्तर व्याख्यान दिले.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्ती पोष्टर प्रदर्शन भरवुन नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती विषयी प्रचार, प्रसार व जनजागृती करण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त व गुणवंत कामगार प्रदीप माळी, बालाजी पांचाळ, जयराम पवार, साहेबराव नासनवाड, साहेबराव शेजवळ, एकनाथ कानडे, पांडुरंग सातदिवे, नागोराव खंदारे, संतोष रोडे, दिलीप पठारे, गौतम ढगे, कैलास सोनवणे, पांडुरंग शिंदे, सचिन वाघमारे, राजू मोरे, संतोष सरदार, सुधाकर बर्डे, रवी अवसरमोल, रमेश गायकवाड, भीमराव खंदारे, वंदना झोडपे, निर्मलाताई खंदारे, देवका बर्डे, धम्मपाल कांबळे सहभागी झाले होते. यावेळी अनेक नागरीकांनी व्यसनमुक्तिचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश झोडपे यांनी केले. तर अविनाश सोनवणे यांनी आभार मानले.